अंडाकरी

साहित्य :-

४ अंडी

वाटणासाठी –
१ मध्यम कांदा (उभा चिरून) + १/२ कप सुकं खोबरं + १/४ टीस्पून कांदा-लसूण मसाला

३ टेबलस्पून कांदा बारीक चिरून

१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट

१ १/४ टीस्पून लाल तिखट

१ टोमॅटो चिरून
३ टेबलस्पून तेल

कृती :-

१.  १ टेबलस्पून तेलात कांदा गोल्डन ब्राऊन  होईपर्यंत भाजून घ्या. मग त्यात सुकं खोबरं आणि कांदा लसूण मसाला घाला आणि ब्राऊन होई पर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झालं कि थोडं पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.

२. एकीकडे ३ अंडी पाण्यात घालून उकडून घ्या. १ अंड नंतर ग्रेवीमध्ये वापरण्यासाठी बाजूला राहू दे .
३. पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून  घ्या. त्यात टोमॅटो घालून परता. आलं-लसूण पेस्ट, हळद आणि तिखट घाला आणि तेल सुटेपर्यंत परता.

४. वाटलेला मसाला घालून परता. आवडीप्रमाणे पाणी घालून थोडं पात्तळ करा. १ अंड फोडून घाला आणि अलगद मिक्स करा. वरून झाकण ठेवा. अंड शिजू दे.
५.मग उकडलेल्या अंड्यांना वरून  ३/४ कापून करी मध्ये सोडा. वरून झाकण ठेऊन १ उकळी काढा.

६. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.

Close Menu