फिशकरी

साहित्य :-

 • प्रथम साधारण अर्धा किलो मासे स्वच्छ धुवून तुकडे करून घ्यावेत.

 • एक मध्यम आकाराचा कांदा फोडणीसाठी बारीक चिरावा

 • लसणीच्या चार पाकळ्या लागतील.

 • २ चमचे हिरवा मसाला

 • दोन ओल्या मिरचीच्या तुकडे करून

 • एक ताजा ओला नारळ खवून घ्यावा

 • मीठ

 • चिंचेचा/आमसुलाचा भिजत टाकून केलेला रस वाटीमध्ये घ्यावा

 • अर्धा चमचा हळद

 • दोन चमचे धने

 • त्रिफळे ४

 • तेल

 • कोथींबीर.

कृती :-

 • प्रथम खवलेला नारळ मिक्सरच्या भांडयात घालून त्यात थोडे पाणी टाकावे आणि मग अर्धा चमचा हळद व २ चमचे हिरवा मसाला व दोन चमचे धने घालून बारीक वाटून घ्यावे.

 • ग्यासवर भांडे ठेवून गरम झाल्यावर त्यात २ चमचे तेल टाकावे.

 • तेल तापताच कांदा व लसूणची फोडणी द्यावी.

 • कांदा गुलाबी लालसर होताच त्यामध्ये मिक्सर मधील वाटपामध्ये मासे कालवून ते फोडणीत टाकावे.

 • चार पेले पाणी घालून झाकण ठेवावे व थोड्याच वेळाने उकळी येण्या पुर्वी वाटीतील चिंचेच्या/आमसुलाच्या रसाचे दोन चमचे पाणी, चार त्रिफळे, ओल्या मिरचीचे तुकडे टाकावेत.

 • कढी मधील पाणी आवश्यकतेनुसार वाढवून मीठ टाकावे व गरज वाटल्यास लाल तिखट टाकावे.

 • कोथींबीरीची पाने टाकून मंद ग्यासवर एक-दोन उकळ्या काढाव्यात.

 • जास्त उकळू नये, अन्यथा मिश्रण फुटून उतू जाण्याची शक्यता असते.

 • मालवणी मच्छी कढी जेवताना भाताचा अक्षरश: फडशा पडतो.

Close Menu