मनचाव सूप

साहित्य :-

१ टेस्पून तेल
५ मोठ्या लसूण पाकळ्या, एकदम बारीक चिरून
१ इंच आल्याचा तुकडा, सोलून बारीक चिरून
१ ते २ हिरव्या मिरच्या
१ कप भाज्या,एकदम बारीक चिरलेल्या – भोपळी मिरची, गाजर, मश्रुम, पाती कांद्याचा पांढरा भाग
३ कप
१ टेस्पून सोया सॉस
१/२ टिस्पून व्हिनेगर
१/२ टेस्पून टोमॅटो केचप
१/२ टेस्पून मॅगी चिली मसाला सॉस
१ टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर
२ चिमटी व्हाईट पेपर पावडर
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी पाती कांद्याचा हिरवा भाग
१/४ कप शेवया (ऐच्छिक)

कृती :-

शेवया: चायनीज नुडल्स पाण्यात उकळवून साधारण ८० ते ९० % शिजवून घ्याव्यात. शिजवलेल्या शेवयांपैकी अर्ध्या शेवया तेलात कुरकूरीत होईस्तोवर तळाव्यात.
१) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण ४ ते ५ सेकंद परतावे. मिरची घालून परतावे. त्यावर चिरलेल्या भाज्या घालून अर्ध्या कच्च्या शिजवाव्यात. मिठ घालावे.
२) भाज्या अर्धवट शिजल्या कि ३ कप वेजिटेबल स्टॉक घालावा. एक उकळी आली कि १ टेस्पून सोया सॉस (light soy sauce), टोमॅटो केचप आणि मॅगी चिली मसाला सॉस घालून उकळवावे. चव पाहावी. लागल्यास मिठ घालावे. व्हाईट पेपर पावडर घालावी.
३) १ टेस्पून कॉर्न स्टार्च १/४ कप पाण्यात मिक्स करून सूपमध्ये घालावे. २-४ मिनीटे उकळी काढून व्हिनेगर घालावे. शेवया वापरणार असाल तर फक्त शिजवलेल्या शेवया घालाव्यात.
सर्व्ह करताना बोलमध्ये आधी सूप घालावे, त्यावर बारीक चिरलेला पाती कांद्याचा हिरवा भाग आणि तळलेल्या शेवया घालाव्यात.

टीप:
१) जर अगदीच व्हेजिटेबल स्टॉक नाही मिळाला किंवा बनवायला वेळ नाही झाला तर साधे पाणीसुद्धा वापरू शकतो

Close Menu