फ्राइड राइस

साहित्य :-

१/२  कप बासमती तांदूळ

१ कप बारीक चिरलेला कांदा

१/४ कप बारीक चिरलेले गाजर

१/४ कप बारीक चिरलेली फरजबी

१/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात

१/४ टीस्पून मिरपूड

१ चिमुट अजिनोमोटो

१ टेबलस्पून सोया सॉस

१ टीस्पून विनेगर  

मीठ चवीप्रमाणे

१/४ कप तेल

कृती :-

१. बासमती तांदूळ धुवून घ्या. पातेल्यात तेल गरम करून त्यात तांदूळ परतून घ्या. ३-४ मिनिटे तांदूळ चांगले परत.तांदूळ सुटसुटीत झाले कि, तांदुळाच्या दुप्पट पाणी घाला. आणि मीठ घालून ढवळा.पाण्याला उकळी आली कि झाकण ठेवून भात शिजवून घ्या. तयार भात झाकण काढून गार करत ठेवा. काटा चमच्याने भात वर- खाली हलवून घ्या म्हणजे शीत मोडणार नाहीत.

२.छोट्या  पातेल्यात तेल गरम करून कांदा फोडणीला घाला. १-२ मिनिटे कांदा परतून झाला कि गाजर आणि फरजबी घालून परता. सोया सॉस, विनेगर, अजिनोमोटो  आणि मीठ  घालून परता. भाज्या अर्धवट शिजवा. पूर्ण शिजू देऊ नका.

३. गार झालेल्या भातात हि भाजी थोडी थोडी घालून अलगद मिक्स करा.मिरपूड आणि सर्वात शेवटी कांद्याची पात  घालून पुन्हा मिक्स करा आणि मंद आचेवर १ वाफ काढा आणि आवडत्या चायनीज ग्रेवी बरोबर सर्व्ह करा.

Close Menu