कोबीचे पराठे

साहित्य :-

  • ५००ग्रा. पीठ

  • २०० ग्रा. किसलेली कोबी

  • १ जुडी कापलेली कोथंबीर

  • १ चमचा गरम मसाला

  • १/२ चमचा मीठ

  • ३/४ चमचे लाल मिरची

  • १ तुकडा बारीक कापलेले अदरक

  • २ कापलेली हिरवी मिरची

  • तूप तळणासाठी

कृती :-

पीठात एक चिमूटभर मीठ मिळवून घट्ट मळावे. कोबीत कोथंबीर, गरम मसाला, उरलेले मीठ, लाल मिरची, आले व हिरवी मिरची टाकुन थोड्याशा तुपात दोन मिनीट फ्राय करून उतरावे.

पिठाचे बरोबर ८ गोळे करावे. एकास लाटून कोबी भरावी व तव्यावर शेकावी.

अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून दह्याबरोबर गरम गरम वाढावे.

Close Menu