शाकाहारी पुलाव

     

साहित्य :-

१२५ ग्रॅम (अर्धी वाटी) बासमती तांदूळ, धुवून, बोटचेपा शिजवून, थंड केलेला

१ छोटे गाजर चोकोनी तुकडे करून

१०-१२ फरसबी कापून

पाव वाटी मटारचे दाणे

१०-१२ काजूचे तुकडे

छोटा पाऊण चमचा मीठ

अर्धा छोटा चमचा मिरी पूड

१ मिरची उभी चिरून (ऐच्छिक)

१ मोठा चमचा साजूक तूप

अख्खा गरम मसाला:

१ छोटा दालचिनीचा तुकडा

३-४ छोटी हिरवी वेलची

८ लवंगा

१ तमालपत्र

कृती :-

तांदूळ स्वच्छ धुवून, पाणी उकळून बोटचेपा शिजवून घेणे.

भाज्या उकळत्या पाण्यात मीठ घालून दोन मिनटे शिजवून, पाण्यातून काढून थंड करून घेणे.

कढईत मोठा चमचा तूप घेऊन, कढई मध्यम आचेवर ठेवणे.

तूप गरम झाल्यावर त्यात अख्खा गरम मसाला आणि काजू घालणे.

मिरची घालायची असल्यास आता फोडणीमध्ये टाकणे.

काजूला सोनेरी रंग आल्यावर त्यात वाफवलेल्या भाज्या घालणे.

आता शिजवलेला भात, मीठ आणि मिरपूड टाकणे.

हलक्या हाताने ढवळून, झाकण ठेऊन ३-४ मिनटे वाफवणे.

Close Menu