गुलाबजाम

Gulabjamun

साहित्य :-

२ वाटी खवा.
१/२ वाटी मैदा.
चिमूटभर सोडा.
३ वाट्या साखर

कृती :-

खव्यात मैदा चांगला मिक्स करा. तुपाचा हात लावून चांगले मळून घ्या. कणकेएवढा सैल झाला पाहीजे. चिमूटभर सोडा घाला
गोल किंवा लांबट गोळे करुन मंदाग्नीवर तळा.
३ वाटी साखर, १,१/२ वाटी पाणी घालून पाक करत ठेवा. ढवळत राहा. एकतारी पाक झाला की गँस बंद करा. ( पाक उकळत असतांना दोन बोटांना चिकटवून एक तार आली की पाक झाला.)
गरम पाकातच गुलाबजाम सोडा.

Close Menu